Friday, February 05, 2010

ती डोळ्यांतुन खुदकन हसते


ती डोळ्यांतुन खुदकन हसते अन गिरक्या लगबग घेते | 

ओठांच्या शिंपलीवरती इंद्रधनु सुंदर अवतरते ||

त्या नाजूक गालांवरती फुलपाखरे किती भिरभिरती | 

सायीच्या हातांमधुनी प्रेमामृत नित पाझरते ||

मखमाल तिच्या स्मरणाने जीव हलका फुलका होतो | 

ममतेचे रेशीम धागे ती असेच गुंफुनी जाते ||
-- अरुंधती

5 comments:

  1. Chhan aahe kavita,
    majhya bhachichi athavan jhali!

    ReplyDelete
  2. धन्यवाद! :-) माझ्या अनेक भाच्या अशाच गोंडस आहेत. त्यांच्या निरागस सान्निध्यात थोडा वेळ जरी घालविला तरी मन प्रसन्न होते!!

    ReplyDelete
  3. BEAUTIFUL PICTURES !
    From:S.srinivasa rao,Indian Blogger

    ReplyDelete
  4. Anonymous12:51 AM

    खूप सुंदर! सायीचे हात ही कल्पना खूप आवडली.
    मिपावरचा तुमचा वसंतोत्सवावरचा लेख आज वाचला. तेथून इकडे आलो.
    छान लिहिता. लिहित रहा. :)

    राघव

    ReplyDelete
  5. राघव, ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! :-)

    ReplyDelete