श्रीमत् शंकराचार्यकृत ‘मानसपूजे' चा कवी विनायककृत अनुवाद
चराचरी तू, आवाहन ये काय तुझ्या कामी ?
सकलाधारा, द्यावे तुजला काय आसना मी ?।
निर्मल जो त्या, केले ठरती अर्घ्यपाद्य वाया,
सकलाधारा, द्यावे तुजला काय आसना मी ?।
निर्मल जो त्या, केले ठरती अर्घ्यपाद्य वाया,
कर वाहेना, आचमन तुला शुद्धाला द्याया ॥१॥
घालू कैसे, तुला निर्मला देवा!स्नानाते?
विश्वोदर तू, तुला वहावा पट कवण्या हाते ?।
निरालंब तू,उपवीताचे महत्त्व तुज नाही,
नसे वासना, फुले सुवासिक निष्फल त्या ठायी ॥२॥
विश्वोदर तू, तुला वहावा पट कवण्या हाते ?।
निरालंब तू,उपवीताचे महत्त्व तुज नाही,
नसे वासना, फुले सुवासिक निष्फल त्या ठायी ॥२॥
गंधाची थोरवी, कोणती नसे लेप ज्याला,
स्वता रम्य तू, फिकी तुजपुढे पडे रत्नमाला।
सदा तृप्त तू, नैवेद्याची काय तुला वाणे,
विभो! तुष्ट तुज, कसे करावे म्या तांबूलाने ? ॥३॥
स्वता रम्य तू, फिकी तुजपुढे पडे रत्नमाला।
सदा तृप्त तू, नैवेद्याची काय तुला वाणे,
विभो! तुष्ट तुज, कसे करावे म्या तांबूलाने ? ॥३॥
नसे अनंता, प्रदक्षिणेचे बल माझ्या ठायी,
अभिन्न तू मी, मग कवणाच्या लागावे पायी?।
तुजला स्तविता, हात टेकिले जेथे वेदांनी,
कशी टिकावी, तेथे वाणी मग बापुडवाणी ? ॥४॥
अभिन्न तू मी, मग कवणाच्या लागावे पायी?।
तुजला स्तविता, हात टेकिले जेथे वेदांनी,
कशी टिकावी, तेथे वाणी मग बापुडवाणी ? ॥४॥
स्वयंप्रकाशी, काय त्यापुढे नीरांजनज्योती ?
विसर्जन तुला कोठे ? विश्वे नांदविसी पोटी ॥५॥
विसर्जन तुला कोठे ? विश्वे नांदविसी पोटी ॥५॥
कळून सारे, सजलो देवा! तुझ्या पूजनासी,
भय न लेकरा, वाटे जाया निजजनकापाशी
चुकले मुकले, शब्द मुलाचे गोडच जनकाते
बालिश लीला, बघून त्याच्या मनी हर्ष दाटे ॥६॥
भय न लेकरा, वाटे जाया निजजनकापाशी
चुकले मुकले, शब्द मुलाचे गोडच जनकाते
बालिश लीला, बघून त्याच्या मनी हर्ष दाटे ॥६॥
अजाण मी लेकरू, तुजकडे जनकाचे नाते,
तव सेवेचा, देवा! ओढा असे मात्र माते।
येईल तैशी, करतो सेवा गोड करूनि घ्यावी,
पुण्यपदाची जोड, वत्सला! विनायका द्यावी ॥७॥
तव सेवेचा, देवा! ओढा असे मात्र माते।
येईल तैशी, करतो सेवा गोड करूनि घ्यावी,
पुण्यपदाची जोड, वत्सला! विनायका द्यावी ॥७॥
'विनायकांची कविता' या चित्रशाळेने १९५५ साली प्रकाशित केलेल्या पुस्तकात ती आहे. संपादन प्रा. भ. श्री पंडित यांचे आहे.
माझ्या आजी-आजोबांना ही मानसपूजा अतिशय प्रिय होती. ते स्वत: तर म्हणायचेच आणि आम्हां मुलांकडूनही म्हणून घ्यायचे. त्यांच्या आवाजात ऐकल्यामुळे व ह्या काव्यातील उपजत माधुर्यामुळे ही मानसपूजा सदैव स्मरणात राहील.
जालावर शंकराचार्यांची शिवमानसपूजा दिसली. त्यातली पहिली ओळ अशी :
ReplyDeleteरत्नैः कल्पितमानसम् हिमजलैः स्नानम् च दिव्यांबरम्
पण ही शिवस्तुती आहे; विनायकांचे भाषांतर अमुक एका देवाला उद्देशून नाही. त्याच्या मूळ स्तोत्राची एखादी ओळ तुम्ही इथे नोन्दवू शकाल का?
'चराचरी तू आवाहन ये' हा शंकराचार्यांच्या शिवमानस पूजेचा स्वैर अनुवाद आहे. मराठीतील मानसपूजेत शंकराचा उल्लेख का नाही, किंवा कसे हे आता सांगणे जरा मुश्किल आहे. परंतु शिवाराधना करणारे किंवा न करणारे, दोहोंसाठी ही सोप्या मराठीतील अवीट गोडीची रचना निश्चितच प्रेरणादायी ठरावी! :-)
ReplyDeleteare wah....mala ekdam aajjiicya kinchit chirakya avajatun manaspuja aiku pan aali
ReplyDeleteतुला आजीच्या 'किनऱ्या' आवाजात म्हणायचं होतं ना? ;-) :-)
ReplyDeleteहा खरोखरच अतिस्वैर अनुवाद दिसतो आहे. (त्याच्यावर आक्षेप नाही.) कारण शंकराचार्यांनी 'चुकले माकले शब्द', 'बालिश लीला', 'अज़ाण' असे उल्लेख न करता 'मी ज़सा अपराधी आहे तसा' असा मोघम उल्लेख केला आहे. यात मला शाकुन्तलातल्या 'आलक्ष्य दंतमुकुलान्' चे पडसाद दिसतात. पण मूळ श्लोकातले हे दोनच शब्द मला माहीत आहेत. ती कल्पना मोरोपन्तांनी फार छान मांडली आहे. 'तुझ्या मळक्या देहाला ज़शी यशोदा ज़वळ घेते, तसा माझ्या मालिन्याचाही तू स्वीकार करशीलच'.
ReplyDeleteतुलाच कशि पोटिशी धरि तदा यशोदा बरे
रजोमलिनकाय तू मळविसी ज़री अम्बरे
- डी एन
सुंदर! :-)
ReplyDeleteहा अनुवाद विनायक जनार्दन करन्दीकरांचा आहे, हे मी विसरूनच गेलो. आणि डोक्यात उगीचच वामन पंडिताचं नांव आलं. (माझ्या माहितीनुसार धुळ्याचे हे करन्दीकर कवी गोविन्द विनायकांचे, म्हणजे विंदांचे, नातेवाईक नाहीत.) शंकरपूजेच्या अनुवादात शंकराचा उल्लेख टाळला आहे, हे मात्र डोक्यात घोळत राहिलं. मग वामनाच्या बर्याच रचना पाहिल्या तर त्या सगळ्या विष्णूशीच संबंधित वाटल्या. वामनपण्डित हा विज़ापूरकडचा, आणि त्या भागातले वैष्णव भलतेच कट्टर असतात. गणेशमन्दिरात न ज़ाणारे तमिळ अय्यंगार वा कर्नाटकी वैष्णव आज़ही दिसतात. आता परत हा लेख पाहतो तो काय शोध की हा अनुवाद वामनाचा नाहीच. म्हणजे मी भलताच बावळटपणा केला.
ReplyDeleteतरीही डोक्यात कीडा आला आहेच तेव्हा वामनानी शंकराला टाळलं होतं का, याचा मी ज़मल्यास शोध घेणार आहे. कवि विनायकांनी शंकराचा उल्लेख का टाळला, हे कोडं आहेच.
अवान्तर : प्रतिसादाची घटिका-पळे पेक्षा तिथी दिसणे महत्त्वाचे. ती सोय करा.
- नानिवडेकर
वैशाख शुक्ल पंचमी-षष्टी असलं काहीतरी, शके १९३२
(उर्फ़, १९-मे-२०१०)