पावसाच्या आठवांत
माझा जीव चिंब झाला
निथळत्या अंगणात
गंध दरवळ ओला
तगमग झाली शांत
तृष्णा धरेची भागली
काळी वसुंधरा माय
बीजे तृप्त हुंकारली
बीजे तृप्त हुंकारली
सृष्टी झाली झाली दंग
गान वृक्षांचे आगळे
साज मोत्यांचे लेऊन
उभे पूजेला ठाकले
असे भिजले गं मन
जशा श्रावणाच्या सरी
काया झाली हलकीशी
निळ्या कान्ह्याची बासुरी....
--- अरुंधती
(छायाचित्र साभार : विकिपिडिया)
सुरेख, अप्रतिम
ReplyDeleteखूप मोजक्या शब्दात यथार्थ वर्णन