Friday, March 11, 2011

साधो, हे मुडद्यांचे गावसंत कबीराच्या एका आगळ्या रचनेचा अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे :
साधो, हे मुडद्यांचे गाव
साधो, हे मुडद्यांचे गाव
पीर मरे पैगंबरही जो मरे
मरती जिवंत योगी
राजा मरे प्रजाही मरणशील
मरती वैद्य अन् रोगी
चंद्रही मरतो मरेल सूर्यही
मरते धरणी अन् आकाश
चौदा भुवनीचे प्रतिपालही मरती
त्यांची काय ती आशा!
नऊही मरती दशही मरती
मरती सहज अठ्ठ्याऐंशी
तेहतीस कोटी देवता मरती
काळाची ही सरशी
नाम अनाम अनंत कायम
दूजे तत्त्व ना होई
कबीर म्हणे ऐक हे साधो
ना भटकत मरणी जाई
-- संत कबीर
मायबोलीकरीण स्वाती आंबोळे यांनी शेवटच्या ओळींचा खूप छान अनुवाद सुचविला. तोही इथे देत आहे :
शाश्वत केवळ ब्रह्मच साधो, बाकी सगळी माया
कबिर म्हणे सन्मार्ग न सोडी, जन्म न जावो वायामूळ काव्य : साधो ये मुरदों का गाँव
मूळ भाषा : हिंदी, रचनाकार : संत कबीर
साधो ये मुरदों का गाँव
साधो ये मुरदों का गाँव
पीर मरे पैगम्बर मरिहैं
मरि हैं जिन्दा जोगी
राजा मरिहैं परजा मरिहै
मरिहैं बैद और रोगी
चंदा मरिहै सूरज मरिहै
मरिहैं धरणि आकासा
चौदां भुवन के चौधरी मरिहैं
इन्हूं की का आसा
नौहूं मरिहैं दसहूं मरिहैं
मरि हैं सहज अठ्ठासी
तैंतीस कोट देवता मरि हैं
बड़ी काल की बाजी
नाम अनाम अनंत रहत है
दूजा तत्व न होइ
कहत कबीर सुनो भाई साधो
भटक मरो ना कोई

6 comments:

 1. Death is 'definite' .. only while living we forget it often. Love these Kabir words and the translation also is good.

  ReplyDelete
 2. धन्यवाद सविता, कबिराची ही रचना मला त्यातल्या थेटपणामुळे आवडते. कसलाही आव नाही. जे आहे ते असं आहे. वास्तवाचं भान आणते ही रचना.:-)

  ReplyDelete
 3. A band called 'Agni' has made video on this poem. They have used first and last stanza. Even with somewhat loud music, I liked the poem when I have heard it.

  ReplyDelete
 4. हो, तुम्ही सांगितल्यावर मी ती लिंक यूट्यूबवर हुडकली. बरं गायलंय की....

  http://www.youtube.com/watch?v=KDr54DEb6qQ&feature=related

  धन्यवाद प्रतिसादाबद्दल! :-)

  ReplyDelete
 5. Anonymous1:25 AM

  ही रचना साकीसारखी आहे, म्हणजे प्रत्येक ओळीत २८ मात्रा (८-८-८-४). मात्र 'मरिहै बैद और रोगी' मधे 'है' ची एकच मात्रा मोज़ली (ती तशी एकनाथ आणि तुलसी यांच्या काही रचनांत मोज़ता येते) तरी एक मात्रा जास्त राहतेच. कबीर छन्दशुद्‌धतेबद्‌दल किती काटेकोर होता मला माहीत नाही. पण काटेकोर असल्यास ही मूळ ओळ वेगळी असावी, आणि हा भ्रष्ट पाठभेद असू शकेल. साकीसाठी 'दूजा तत्त्व न होई' (होइ नाही) लागेल. आणि 'कहत कबीर सुनो भाई साधो' मधे तर दोन मात्रा जास्त येतात. त्या कमी करण्यासाठी 'कहत कबीर सु-नो भइ साधो' शब्द वापरून भाई मधल्या दोन मात्रा कमी करतात, अशी माहिती मला मिळाली आहे.

  तुमच्या आजच्या नामदेवांबद्दलच्या प्रश्नाची मला माहिती नाही, पण 'नामदेवाचे अभंग' असं विनोबांचं संकलन त्यांच्या टीकेसहित उपलब्ध आहे. (हे पुस्तक मी आत्ता शोधलं, पण मी चुकून बहुतेक नागपूरलाच ते ठेवलं आहे.) ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम यांचेही विनोबा-संकलित अभंग नागपूरला हिस्लॉप कॉलेजज़वळ 'सर्वोदय केन्द्र' की असल्या कुठल्या कळकट, ज़ुनाट ज़ागी मिळतात. विष्णुसहस्रनामांवरची विनोबांची टीकाही तिथे मिळते. कुराण-सार, ख्रिस्त-धर्म-सार ही मराठी पुस्तकं तर मिळतातच, पण त्यातल्या काही अध्यायांना विनोबांनी चक्क संस्कृतात अनुष्टुभात किंवा स्वैर मांडणीत शीर्षकेही रचली आहेत. उदाहरणार्थ उटणे लावणे (मत्तय) आणि यरुशलेम प्रवेश (मार्क) यांच्या वर्णनांच्या अनुवादावर : 'अभ्यंजनं, सुप्रवेशस्‌, ततो मन्दिर-शोधनम्‌'. मेरीच्या गर्भधारणेवर 'अथेदं मातृसुक्तेन - क्रियते स्वस्तिमंगलम्‌' असा श्लोक रचला आहे.

  ReplyDelete
 6. धन्यवाद ह्या माहितीबद्दल. साकीच्या ह्या नियमांबद्दल मला जास्त काही माहित नाही, मात्र गाताना गायक शब्दांच्या आकारातून सूट घेऊन कधी ते शब्द मात्रेत बसवताना, किंवा एखाद्या शब्दाला आकार देऊन तो लांबवून त्या मात्रेत बसवताना ऐकलं आहे. तो शब्द मूळ चीजेत त्या प्रकारे नसतो, पण गाताना तसे स्वातंत्र्य घेतले जाते.

  ReplyDelete