कृष्णमेघ घननीळ दिगंतर
चांदेरी किरणांची प्रभावळ |
गहिर्या कोमल मंतरल्या क्षणी
तुझ्या मंद हास्याची चाहुल ||
पिऊन टाकिले गगन अंतरी
नेत्री सावळे स्वप्निल काजळ |
तृषार्त मीही तरीही का रे
तुझ्या ओढीने कातर पाऊल ||
पुष्करिणींचे सलिल सुगंधी
वृक्षजटांचे हिरवे जावळ |
तुझ्याचसाठी कुसुमकळांनी
मऊ रेशमी भरीली ओंजळ ||
गभिर घना तू धावत ये रे
निळामिठीने अथांग व्याकुळ |
अनंतब्रह्मा द्वैत मिटवुनी
पुन्हा बरसू दे सगुण तीर्थजल ||
--- अरुंधती
चांदेरी किरणांची प्रभावळ |
गहिर्या कोमल मंतरल्या क्षणी
तुझ्या मंद हास्याची चाहुल ||
पिऊन टाकिले गगन अंतरी
नेत्री सावळे स्वप्निल काजळ |
तृषार्त मीही तरीही का रे
तुझ्या ओढीने कातर पाऊल ||
पुष्करिणींचे सलिल सुगंधी
वृक्षजटांचे हिरवे जावळ |
तुझ्याचसाठी कुसुमकळांनी
मऊ रेशमी भरीली ओंजळ ||
गभिर घना तू धावत ये रे
निळामिठीने अथांग व्याकुळ |
अनंतब्रह्मा द्वैत मिटवुनी
पुन्हा बरसू दे सगुण तीर्थजल ||
Athavli ga Athavli Nilamithi athavli mala :) :) :)
ReplyDelete"पुष्करिणींचे सलिल सुगंधी वृक्षजटांचे हिरवे जावळ |
ReplyDeleteतुझ्याचसाठी कुसुमकळांनी मऊ रेशमी भरीली ओंजळ ||"
........ अप्रतिम संकल्पना
(मानवी जीवनाचं निसर्गाशी अतूट नात .....)
आणि .......... "वृक्षजटांचे हिरवे जावळ"
...... (शब्द सुचत नाहीत मला) .... Hats off
आपला परिचय नाही.
समजणार्या आणि मनाला भिडणार्या नवीन कविता Net वर वाचायला मिळण हा दुर्मिळ योग असतो.
आज 'मराठीमंडळी' या web-site मुळे तो आला.
याबाबत आणखी काही विचार व्यक्त करायचे आहेत.
शक्य असल्यास कृपया मला mail करा.
मी तुमच्या मेलच्या reply मध्ये व्यक्त करेन.
...... उल्हास भिडे (५७)
बोरिवली - मुंबई
mail-id : ulhasbhide@gmail.com
Orkut Profile Link :
http://www.orkut.co.in/Main#Profile?rl=mp&uid=14681269726108052967
धन्यवाद उल्हास जी! आपल्याला आपल्या ओर्कुट प्रोफ़ाईल वर संपर्क साधेनच! कवितेचा उत्तम रसास्वाद घेता येणं हे देखील भाग्यच! तुम्ही भाग्यवंत आहात की तुमच्याजवळ ती संवेदना आहे! :-)
ReplyDeletemastach.
ReplyDeletekavita aavadalee