Tuesday, February 02, 2010

गुणसूत्रांची भेसळ थांबवा!


नमस्कार!
ह्या घडीला पर्यावरण मंत्री जयराम रमेश अमेरिकन हितसंबंध असलेल्या कॉर्पोरेशन्सना भारतातील फळभाज्यांचा राजा असलेल्या "वांग्या"च्या गुणसूत्रांत अनैसर्गिक बदल करण्याचा परवाना द्यावा अथवा नाही याबद्दल विचारविनिमय करत आहेत. येथे एका अभिनव पद्धतीने मंत्री महोदयांना भारतातील वांग्याचे रक्षण करण्याची विनंती करण्यात येत आहे : जगातील सर्वात मोठ्या पातळीवर वांग्याचे भरीत बनविण्यात येत आहे. आणि ते भरीत दिल्लीतील हजारो गरीब व भुकेल्या जनतेला वाटण्यात येणार आहे. ध्येय आहे २०,००० (वीस हजार) वांग्यांचे! तुम्ही खालील पिटिशनवर साईन (स्वाक्षरी) करून त्यांत एका वांग्याची भर टाकाल काय?
http://greenpeace.in/safefood/the-biggest-baingan-bharta-ever/
पिटिशन मध्ये लिहिले आहे : "भारताने आपल्या वांग्यांना अमेरिकन हितसंबंध असलेल्या कॉर्पोरेशन्सद्वारा प्रदूषित होऊ देऊ नये." धन्यवाद!
--- अरुंधती

6 comments:

  1. अमेरिकेत मात्र ऑरगॅनिकचा जोरदार प्रचार चालू आहे...

    ReplyDelete
  2. हाच तर विरोधाभास आहे! जर बीटी उत्पादन काही लोकांच्या म्हणण्यानुसार एवढे "चांगले" असेल तर आज अमेरिकेत ऑरगॅनिकचा असा प्रचार का व्हावा, ही मंत्री व बीटी प्रचार करत असलेल्या सर्वांनी गंभीरपणे विचार करायची गोष्ट आहे!

    ReplyDelete
  3. Chhan aahe kalpana!

    ReplyDelete
  4. ब्लॉग वर आपले स्वागत! आपल्या सर्वांचा हातभार व पाठिंबा स्वागतार्ह आहे!:-)

    ReplyDelete
  5. सहज सुंदर आयुष्याचा घेते चांदणझोका | या रसिकांनो रंजक वेधक गोष्टी माझ्या ऐका || वा...! छान हे सबटायटल आहे. पोस्ट पण आवडलं.

    ReplyDelete
  6. नरेंद्रजी, ब्लॉग वर आपले स्वागत! ह्या ओळी ब्लॉग तयार करत असताना उस्फूर्त सुचल्या.... तुम्हाला आवडल्या, धन्यवाद! :-)
    पोस्ट मधील मजकूर बराचसा त्या साईट वरून उचललेला व भाषांतरित आहे. भारतीय वांग्याला वाचवायला सुरु केलेली ही मोहीम अशी आहे ज्यात सामान्य माणूस देखील भाग घेऊ शकतो. म्हणूनच हे पोस्ट ब्लॉग वर प्रकाशित केले.

    ReplyDelete