Wednesday, March 02, 2011

मला काय झाले? मला काय झाले?


मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने मायबोलीवर आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमध्ये हा मूळ पंजाबी काव्याचा मराठीतील अनुवाद मी सादर केला. मूळ काव्य बाबा बुल्ले शाह यांचे असून काव्याचा आशय फार सुंदर आहे :

मला काय झाले? मला काय झाले?
ममत्व माझ्यातुनी ऐसे हरपले
खुळ्यासारखा मी विचारीत बसतो
सांगाल जन हो, मला काय झाले
हृदयात माझ्या डोकावलो मी
स्वतः नाही उरलो हे मलाही कळाले
तूचि वससी सदा ह्या मम अंतरी
आपादमस्तकी तूचि तू
आत - बाहेर केवळ तू!


मूळ काव्य : मैनूँ की होया मैथों गई गवाती मैं

कवी : बुल्ले शाह (इ.स.१६८० ते १७५७)
भाषा : पंजाबी

मैनूँ की होया मैथों गई गवाती मैं,
जियों कमली आखे लोकों मैनूं की होया
मैं विच वेखन ते नैं नहीं बण दी,
मैं विच वसना तूं।
सिर तो पैरीं तीक वी तू ही,
अन्दर बाहर तूँ |

8 comments:

  1. खुप छान अनुवाद,
    माझ्या अनुदिनीचा पत्ता:http://prashantredkarsobat.blogspot.com/

    ReplyDelete
  2. Anonymous11:53 AM

    'वससी', 'आपादमस्तकी' ही भाषा इतर ओळींबरोबर नीट बसत नाही, पाहुणी वाटते. अगदी कुसुमाग्रजांच्या योग्यतेच्या कवीलाही अशी तडज़ोड क्वचित करावी लागते. 'परमेश्वर नाही घोकत मन मम बसले', मधे 'मम' हा मोरोपन्ती शब्द उपरा वाटतो. पण त्या शब्दयोजनेच्या समर्थनार्थ निदान 'मात्रांचं बंधन' हे कारण समज़ता येईल. तुमच्या कवितेत उपरे शब्द टाळले असते, तर धरलेला सूर नीट टिकवला गेला असता, असं वाटतं.

    - नानिवडेकर

    ReplyDelete
  3. धन्यवाद नानिवडेकर.

    मी माझ्या परीने अनुवाद करायचा प्रयत्न केलाय हो! मला काव्याचा मतितार्थ भावला, आवडला आणि तो मराठीत आणायचा प्रयत्न केला. तुमच्या प्रामाणिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद. :-)

    ReplyDelete
  4. Anonymous6:26 AM

    "मी माझ्या परीने" -> त्याला कोणी हरकत घेतली आहे? संस्कृतप्रचुर शब्द त्या अनुवादात चपखल बसत नाहीत, हे माझं मत.

    "मतितार्थ" -> मथितार्थ. ज़े सार-नवनीत असतं ते मन्थन केल्यावर मिळतं, म्हणून ते मन्थित -> मथित.

    बुल्ले शहाच्या शब्दांतला एक भाग हा कोड्यात टाकणारा वाटतो. 'समोर की पाठीमोरा न कळे' हा बुचकळ्यात पाडणारा अनुभव ज्ञानदेवाला आल्यावर त्यानी लोकांना त्याचा अर्थ विचारला नाही. लोक म्हणजे तुमच्या-माझ्या-सारखे. ते ज्ञानदेवाला काय कपाळ अर्थ सांगणार? 'असला गोन्धळ हाही साक्षात्काराचा एक भाग' हे ज्ञानेश्वरानी सांगायचं आणि आपण ऐकायचं. तेव्हा 'सांगाल जन हो' हा प्रश्न सामान्यांना केला आहे, की काही खास अधिकारी लोकांनाच? त्या ओळीत 'कमली आखे' सन्दर्भ का आला आहे?

    - डी एन

    ReplyDelete
  5. कमली = बावरी, खुळी. खुळी(खूळ लागलेल्या एखाद्या स्त्री)प्रमाणे मी म्हणतोय : मला काय झाले?
    'सांगाल जन हो ' हे सर्वसामान्यांना उद्देशून आहे. आजूबाजूच्या लोकांना उद्देशून.

    ReplyDelete
  6. Anonymous10:55 AM

    स्वत:मधे परमेश्वर प्रतीत होणारा माणूस 'मला काय झाले' हे लोकांना विचारेल, हे मला फार विसंगत वाटतं. उलट 'परमेश्वर गवसला' यापलीकडे सांगता येणार नाही आणि ते सांगूनही लोकांना ते कितपत कळेल, ही शंका रास्त वाटते. 'तुका म्हणे मज़ - साक्ष आली देखा -- आणिक या लोकां - काय सांगू', हे मला पटतं.

    कुरूप बदकं राजहंसाला टाळत असतील, पण लोक 'दावूनी बोट त्याला' हसून, पाडून बोलतील हे पटत नाही. मुळात राजहंस बदकापेक्षा श्रेष्ठ, हे माणसानी तसं ठरवलं म्हणून. तो मानवच राजहंसाला कसा हसणार?

    या विसंगत वाटणार्‍या ओळींत भलताच दुसरा अर्थ असल्यास त्याची कल्पना नाही. ओळी खटकतात हे मात्र नक्की.

    ReplyDelete
  7. तो अचंबा आहे हो.... अ सेन्स ऑफ वंडर.... खुळा माणूस स्वतःशीही बोलत असतो, लोकांशीही बोलत असतो.... कधी तर तो ईश्वराशीही बोलत असतो.... त्याचं त्यालाच कळत नसतं.... ही अवस्था झाली आहे बुल्ले शाहची! तो त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा करतच नाहीए. फक्त त्याचं आश्चर्य, विस्मय व्यक्त करतोय.

    ReplyDelete