आयुष्यातलं पहिलंवहिलं प्रेमपत्र लिहायचं होतं.....
मनात खूप धाकधूक वाटत होती.... छातीचे ठोके वाढायचे, तळहात घामेजायचे....सर्व नर्व्हस असण्याची लक्षणे उफाळून यायची!
काय करणार? आधी कधी असलं लिखाण केलं नव्हतं ना....
शाळेत कधी कोणी 'प्रेमपत्र असे असे लिहावे' म्हणून मार्गदर्शन पण केले नव्हते!
मायना काय लिहावा??
सप्रेम नमस्कार म्हणावे, 'हाय' 'हॅल्लो' करावे की अजून काही लिहावे?
कसलं झंजट आहे यार हे प्रेमपत्र लिहिणं.....
बाजारात टॉम क्रूझचं पोस्टर मिळतं, ते घेऊन आले. तसा तो मला फार काही आवडत नाही, पण डोळ्याला बरी आहे हिरवळ! त्याच्या डोळ्यात डोळे घालून झाले.... म्हटलं, आता तरी शब्दांचा पाऊस पडेल, माझ्या भावछटा बहुरंगांमध्ये उमलतील, विचारांचे मोर थुई थुई नाचतील....
मग मी अशीच कण्हत, कुंथत, सुस्कारे सोडत कादंबरीमधल्या नायिकेसारखी 'सौधावर मावळत्या सूर्याच्या किरणांकडे अनिमिष नेत्रांनी' वगैरे पाहायला लागले.
शेजार्यांनी आस्थेनं विचारलं, ''बरं वाटत नाहीए का? डॉक्टरांना दाखवलंस का?'' घ्या!!!!
वैतागून मी बाजारातून काही कवितांची पुस्तके आणली. कविता ह्या बर्याचदा प्रेमानुभूती वगैरे वगैरे विषयी असतात ह्या विषयी खूप ऐकून होते. पण अहो, मी आणलेल्या कवितासंग्रहांमध्ये ''दाहक समाजमन'', ''खुळ्या बेटाचं आत्मवृत्त'', ''मी पणती झाले तर'' असे एकाहून एक अनाकलनीय विषय होते. त्यातील काही ओळी उचलून जर मी माझ्या प्रेमपत्रात घातल्या तर झालंच कोटकल्याण!
चित्रपटगृहांत काही 'प्रॉमिसिंग' गोडमिट्ट, ओशट रोमँटिक चित्रपट झळकले होते. माझा मोर्चा मी त्यांच्याकडे वळवला. त्यातल्या झाडांभोवतीच्या फेर्या मोजता मोजता मलाच भोवळ यायला लागली. हिरवळींवरची लोळणफुगडी गीते, बर्फाळ वातावरणातील कवायती पाहिल्यावर 'हे काय खरं नाय बोवा!' असे विचार मनात घोंगावू लागले. घरी व्हिडियोवर जुन्या जुन्या प्रणयचित्रपटांना पाहण्याचा व्यर्थ प्रयत्नही करून झाला. पण प्रत्येक चित्रपटाच्या मध्यांतरापर्यंत मी एकतर जांभयांनी हैराण झालेले असायचे किंवा अस्वस्थपणे चित्रपट 'फॉरवर्ड' करण्याचा मोह टाळत असायचे! शेवटी तोही नाद सोडून दिला.
आता माझ्यासमोर एकच पर्याय शिल्लक दिसत होता. रोज सायंकाळी डोळ्यांना जाडसर गॉगल लावून, डोक्याला स्कार्फ गुंडाळून मी बागा, उद्याने, नदीकिनार्याला भेट देऊन तिथे झाडाझुडुपांआड लपत-छपत प्रेमी युगुलांची टेहळणी करू लागले. फार काही पदरात पडले नाही, पण मुंग्यांनी कडाडून डसणे म्हणजे काय असते, भलत्या ठिकाणी भलत्या कोनात अंग वळवल्याने त्याचा सर्व शरीरावर कसा 'बधिर' इफेक्ट होतो, काटेरी झुडुपांच्या आड लपण्यातले १०१ धोके इत्यादी गोष्टींचे ज्ञान मला फार जवळून झाले. आणि एक दिवस मग पोलिस मामानेही हटकले... ''हितं काय करताय वो ताई तुमी... भल्ल्या घरच्या दिसता म्हनून इच्चारलं.... ह्या वक्ताला हितं फकस्त ती गुटर्गू करनारी कबुतरं दिसत्याती.... तुमी आपलं घरला जावा....'' आता मात्र हा शुद्ध अन्याय होता! पोलिसाला देखील माझ्यावर भरवसा नसावा!!!
रागाने तणतणतच मी घरी परत आले. त्याच संतापाच्या भरात खस्सकन ते गोजिरे नोटपॅड पुढे ओढले आणि मुंडी खाली घालून पल्लेदार वाक्यांची बरसात सुरू केली.
दुसर्या दिवशी ते प्रेमपत्राचे पाकीट पोस्टपेटीत घालताना पुन्हा छातीत धडधड, घशाला कोरड, तळहाताला घाम अशा सर्व लक्षणांना अनुभवले. पण आता मी मागे हटणार नव्हते! मोठ्या धीराने पाकिटाला पोस्टपेटीच्या 'आ' वासलेल्या तोंडात ढकलून मी श्रद्धाळूपणे त्या पेटीला नमस्कार केला आणि मेघदूतातील नायकाच्या आर्ततेने माझे पत्र झणी पोचव म्हणून तिला साकडे घातले.
पुढचे पाच दिवस जाम टेन्शनमध्ये घालवले. फोन वाजला की तो घ्यायला जीव धजवत नसे. न जाणो, नकाराचा असला तर? पोस्टमन आला की मी लपून बसत असे.... माझे पत्र 'साभार परत' आले असले तर????
अखेर आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर तो फोन आला. पलीकडून शांत शब्दांत मला सुवार्ता सुनावली गेली, ''अभिनंदन! आपण पाठवलेलं प्रेमपत्र आमच्या सर्वोत्कृष्ट तीन प्रेमपत्रांतील एक म्हणून निवडलं गेलं आहे. प्रेमपत्र स्पर्धेच्या बक्षीस समारंभाविषयी लवकरच आपणास कळवू!''
माझ्या कष्टांना, अथक श्रमांना, संशोधनाला फळ आले होते! :-)
त्या प्रत्यक्ष पिळवटून टाकणार्या, गहिर, बेदर्दी अनुभवास सामोरे न जाता कडेकडेने, सावधपणे प्रेमाच्या अनुभवाचे फक्त निरीक्षण करून त्याविषयी शब्दमनोरे रचणार्या माझ्या सर्जनशीलतेची ती जीत होती की प्रेमकणांच्या घायाळ अनुभूतीला पारख्या झालेल्या माझ्या हृदयाची हार?
--- अरुंधती
khup mast lihile aahe. maja aali vachtana!
ReplyDeleteरोहिणी, ब्लॉग वर स्वागत! आणि प्रतिक्रियेबद्दल आभारही!:-)
ReplyDelete"सौधावर मावळत्या सूर्याच्या किरणांकडे अनिमिष नेत्रांनी' वगैरे पाहायला लागले.
ReplyDeleteशेजार्यांनी आस्थेनं विचारलं, ''बरं वाटत नाहीए का? डॉक्टरांना दाखवलंस का?'' घ्या!!!!"
"पण मुंग्यांनी कडाडून डसणे म्हणजे काय असते, भलत्या ठिकाणी भलत्या कोनात अंग वळवल्याने त्याचा सर्व शरीरावर कसा 'बधिर' इफेक्ट होतो, काटेरी झुडुपांच्या आड लपण्यातले १०१ धोके इत्यादी गोष्टींचे ज्ञान मला फार जवळून झाले. आणि एक दिवस मग पोलिस मामानेही हटकले... ''हितं काय करताय वो ताई तुमी... भल्ल्या घरच्या दिसता म्हनून इच्चारलं.... ह्या वक्ताला हितं फकस्त ती गुटर्गू करनारी कबुतरं दिसत्याती.... तुमी आपलं घरला जावा....'' आता मात्र हा शुद्ध अन्याय होता! पोलिसाला देखील माझ्यावर भरवसा नसावा!!!"
हा हा हा हा... सुस्साटच झालं आहे हे प्रेमपत्रप्रकरण. सगळंच झक्कास पण हे दोन वाचून तर जामच हसलोय.
अरुंधतीजी खूपच छान लिहिले आहे; पण आता उत्सुकता एकच प्रेमपत्र स्पर्धेत बक्षिस मिळविलेले ते पत्र वाचण्याची इच्छा आहे. कृपया ते ही ब्लॉगवर टाका बुवा.
ReplyDeleteहेरंब, त्या 'हेरगिरी' बद्दल लिहिताना मला सुध्दा जाम हसू येत होतं.... लिहिताना मला मजा आली, आता वाचताना तुम्हाला मजा येत आहे म्हटल्यावर छानच की! प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-)
ReplyDeleteप्राजक्ता, नक्की टाकेन ब्लॉगवर ते प्रेमपत्र आठवलं तर.... तेव्हा एवढी अक्कल नव्हती गं, की अशा पत्राची एक कॉपी आपल्याकडे पण ठेवायची असते म्हणून! :-) प्रतिसादाबद्दल आभार!
ReplyDeleteमस्त लिहिले आहे,
ReplyDeletesolid हसले वाचताना.
सोनाली
मस्त लिहिलंय... एक number चं... खूप मजा आली... आणि हे सगळ एका स्पर्धेसाठी होत... हा हा हा..
ReplyDeleteChaan zaliye post tumachi!
ReplyDeleteमस्तच झालाय लेख ताई..कामावर मी संगणकाकडे बघून का हसतोय हा प्रश्न माझ्या इटालिअन सहकाऱ्यांना पडलाय..
ReplyDeleteसोनाली, तुला लेख आवडला आणि तू तसं आवर्जून कळवलस, ह्यातच सर्व आलं! तुझे हार्दिक आभार! :-)
ReplyDeleteरोहन ब्लॉगवर स्वागत! वाटलं असेल 'स्पर्धेसाठी हा केवढा आटापिटा'.... पण तो स्पर्धेसाठी नव्हता तर ज्याबद्दल आपल्याला काहीही धड माहीत नाही त्या 'प्रेमपत्र' लिखाणाबद्दल होते ते परिश्रम! प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-)
ReplyDeleteआशिष, ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभार! :-)
ReplyDeleteविद्याधर, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! त्या इटालीयन लोकांना कसं बरं कळणार हे भारतीय प्रेमपत्र प्रकरण?
ReplyDelete:-) हा हा हा
Mast Zali aahe post!!!
ReplyDeleteब्लॉग वर आपलं स्वागत, मनमौजी आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-)
ReplyDeleteमस्तच लिहिलंय ...
ReplyDeleteधन्यवाद! :-)
ReplyDeleteकथा आवडली.
ReplyDeleteविशेषत: ते स्पर्धेसाठी प्रेमपत्र होत
हा Anticlimax छानच वाटला.
त्याचप्रमाणे शेवटची ओळ
मनाला स्पर्श करून गेली.
धन्यवाद उल्हासजी ! :-)
ReplyDelete